नवी दिल्ली : दिल्लीतील भजनपुरा भागात इमारत कोसळली. त्यात 13 जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर तीन विद्यार्थ्यांचा तपास लागू शकलेला नाही.
शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दूर्घटना घडली. त्यात 13 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर अद्याप तीन जण बेपत्ता आहेत. बांधकाम सुरू असणाऱ्या या इमारतीत एक कोचिंग क्लास भरत असे.
इमारत पडल्याचा फोन दुपारी साडेचार वाजता आला होता. अग्निशामक दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना झाले होते. तेथे मदत कार्य अद्याप सुरू आहे,असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.