रायगडसह 13 किल्ले, गडकोट दत्तक घेणार – खासदार छत्रपती संभाजीराजे

परिंचे- छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून किल्ले बांधले असून हा इतिहास जिवंत रहाण्यासाठी शासनाचा एकही पैसा न घेता महाराष्ट्रातील रयतेच्या साथीने स्वत: पुढाकार घेऊन रायगड किल्ल्यासह 13 गडकोट किल्ले दत्तक घेणार असल्याची घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

परिंचे येथे ग्रामस्थ व राजे लखोजीराव जाधवराव ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “सप्तसहस्री’ गणोजीबाबा जाधव यांच्या 314 व्या पुण्यतिथीनिमित्त राम वाघोले लिखीत ऐतीहासिक “परिंचे गाव’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केली. यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, अमरसिंह राजे जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, सरपंच ऋतुजा जाधव मान्यवर म्हणून उपस्थित होते.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, जुने किल्ले बघितल्यावर शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टी कळते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगून तरुणांनी इतिहासाचा अभ्यास करून इतिहास घडवावा. राम वाघोले या तरुणाने मोडी लिपीचा अभ्यास करून जुने दस्तावेज पाहून परिंचे गावचा इतिहास लिहिला ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे म्हटले.

विजय शिवतारे यांनी परिंचे गावातील शालेय जीवनातील आठवणी सांगत गावातील प्राचीन मंदिरे व जुने वाडे हे गावचे वैभव असल्याचे सांगितले. जुन्या मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणशेखर जाधव, प्रस्तावित पी. एस. जाधव यांनी तर विक्रमसिंह जाधव यांनी आभार मानले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.