सातारा-जावळीतील पाच रस्त्यांसाठी 13 कोटी मंजूर

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहे.
शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; विकासकामांचा झंझावात सुरू ठेवणार

सातारा – माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य शासनाच्या रस्ते, पूल परीक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत रस्ते दुरुस्ती योजनेतून सातारा आणि जावळी तालुक्‍यातील पाच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 13 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे, विकासकामांचा झंझावात सुरुच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्य शासनाकडून राज्य मार्ग 4 ते म्हसवे, करंजे, मोळाचा ओढा, शाहूपुरी, जुना मेढा रस्ता ते सारखळ या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी 50 लाख, सातारा, गजवडी, ठोसेघर, चाळकेवाडी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी 40 लाख, सातारा-कास-बामणोली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 45 लाख रुपये, जोर-वाई-पाचवड-मेढा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी 15 लाख रुपये तर सातारा-कास-बामणोली, तापोळा-महाबळेश्‍वर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चार कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून सर्व कामे दर्जेदार करा, अशा सूचना त्यांनी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.