राजगुरूनगर : डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून आज १३ ‘कोरोना’मुक्त रुग्णांना डिस्चार्च

‘कोरोना’मुक्त रुग्णांना फुलांचा वर्षाव, गुलाबपुष्प आणि टाळ्या वाजवून निरोप 

राजगुरूनगर (प्रतिनिधी) : देशातील ग्रामीण भागातील महिला डॉक्टरांसह सर्व महिला कर्मचारी सेवा देत असलेल्या राजगुरूनगर येथील जिल्हा परिषद व पंचायत माध्यमातून सुरु झालेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) च्या पवार हॉस्पिटल मधून आज १३ ‘कोरोना’मुक्त रुग्णांना डिस्चार्च देण्यात आला. त्यांच्यावर महिला डॉक्टर महिला कर्मचारी, पंचायत समितीचे सभापती यांच्या उपस्थितीत फुलांचा वर्षाव करीत गुलाबपुष्प देत टाळ्या वाजवून या रुग्णांना निरोप देण्यात आला.

राजगुरूनगर येथे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समितीच्या माध्यमातून येथे पवार हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर(DCHC) सुरु करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या रुग्णालयात महिला डॉक्टरसह सर्व कमर्चारी महिला असून देशातील महिला चालवत असलेले हे पहिलेच डेडीकेट कोव्हीड हेल्थ सेंटर आहे. गेली १५ दिवसांपूर्वी हे सेंटर जिल्हा परिषदेने सुरु केले आहे. पॉझिटिव्ह असलेले परंतु जास्त सिम्टन्स नसलेले बाधित व्यक्ती या हॉस्पिटमध्ये उपचार घेत होते. आज पहिल्यांदाच या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून १३ व्यक्ती बऱ्या करून त्यांना घरी सोडण्यात आले.

येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ५० बाधित रुग्णांवर उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांना जेवण नाष्टया ची आणि आवश्यक सुविधांची सर्व सोय करण्यात आली आहे. ३ महिला डॉक्टरसह १४ महिला कर्मचारी येथील ४० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करीत आहेत. आज त्यांनी उपचार केलेल्या१३ करोनाबाधित व्यक्तींना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यावेळी  पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या डॉक्टर शीतल पवार यांच्यासह सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बऱ्या झालेल्या रुग्णांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

याबाबत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या डॉ. शीतल पवार यांनी सांगितले, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर जिल्हा परिषद, खेड पंचायत समिती व पवार हॉस्पिटल च्या माध्यमातून चालवले जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्व महिला कर्मचारी काम करीत आहेत.७५ कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्णाची सोय केली आहे. ४५ रुग्णावर उपचार सुरू आहेत त्यापैकी १३ रुग्ण बरे होऊन आज घरी सोडण्यात आले. येथे १२ बेड्चे आयसीयू असून ४ क्रिटिकल पेशंट बरे केले आहे.

पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले, तालुक्यात आठ दिवसात तालुक्यात बाधित व्यक्तींची संख्या वाढली आहे अधिकारी पॉझिटिव्ह आले असले तरी नागरिकांनी घाबरू नये प्रशासन सक्षम व सज्ज आहेत अधिकारी पॉझिटिव्ह आले तरी त्याखाली सर्व कर्मचारी आणि आम्ही पदाधिकारी नागरिकांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहोत. ८४५ पर्यंत तालुक्यात बाधित व्यक्ती झाल्या असून साडेचारशे पर्यंत रुग्ण बरे झाले आहेत.

‘कोरोना’मुक्त तरुणीने सांगितले, येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये डॉक्टरांनी आमच्या सोबत मित्र म्हणून वागले, करोनाची भीती डॉक्टारांनी आमच्या मनातून काढून टाकली. शक्यतो डॉक्टर करोना बाधित व्यक्तीपासून दूर असतात मात्र येथे मैत्रिणी बनून डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यानी आम्हाला सांभाळले आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोव्हीड पेशंटची सोय करण्यात आली आहे म्हाळुंगे येथील कोविड केअर सेंटर मध्ये १४०८ बेडची सोय करण्यात आली आह. पवार हॉस्पिटल राजगुरूनगर येथिल डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये ७५ बेडची सोय करण्यात आली आहे. याबरोबरच चाकण येथे २ हॉस्पिटल मध्ये सोय आहे. तालुक्यात  डीसीएच हॉस्पिटल सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. येथील सर्व कोविड सेंटर हॉस्पिटल मध्ये डॉक्टर रुग्णाची काळजी घेत आहेत. तर प्रशासन डॉक्टर आणि रुग्णांना सर्व सर्व प्रकारच्या सेवा पुरवत आहेत, असे सभापती राक्षे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.