सोलापूरमध्ये लोकसभेसाठी 13 उमेदवार रिंगणात, तर बसपाच्या राहुल सरवदे यांच्यासह 11 उमेदवारांची माघार

जयसिद्धेश्वर महास्वामी, प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यात होणार तिरंगी सामना
सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून कॉंग्रेसचे आघाडीचे सुशीलकुमार शिंदे, भाजप-शिवसेना महायुतीचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होणार असून बसपाच्या राहुल सरवदे यांनी ऐनवेळी निवडणूक रिंगणातून माघार घेत वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे यंदाची सोलापूर लोकसभा निवडणूक रंगतदार आणि काट्याची टक्कर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोलापूर लोकसभेसाठी एकूण 26 उमेदवारांनी 24 अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 11 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा 18 लाख मतदार आहेत. यामध्ये प्रामुख्याने लिंगायत, मराठा, तेलगू, मुस्लिम, नवबौद्ध यांचा समावेश आहे. आतापर्यंत लिंगायत आणि मराठा समाजाचे मतदान निर्णायक राहिले आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक चुरशीची झाल्याने मतदारराजा कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.