पुरंदर तालुक्‍यात 13 बाधित; एकाचा मृत्यू

पुणे (वार्ताहर) – पुरंदर तालुक्‍यात करोनाचा कहर सुरूच असून दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या ही सगळ्यांसाठीच चिंतेची बाब ठरत आहे. सोमवारी (दि. 20) तालुक्‍यात 13 बाधितांची भर पडली आहे. यात सासवड शहर 6 तर ग्रामीण भागात 7 जणांचा समावेश आहे. तर दिवे येथील एकाचा मृत्यू झाला आहे.

पुरंदर तालुक्‍यात आतापर्यंतपर्यत 371 तर सासवड शहरातील संख्या 216 वर पोहोचली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नारायणपूर येथे सोमवारी पहिला रुग्ण आढळला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले. ग्रामीण भागात कोडीत 2, कुंभारवळण 1, पिसर्वे 1, गुऱ्होळी 1, कोळविहिरे 1, नारायणपूर 1 असे 7 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, दिवे येथील मृत व्यक्‍ती दि. 11 तारखेपासून आजारी होती. प्रथम तो सासवड येथे व नंतर पुणे येथे दाखल झाला. त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. पुण्यात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

…कोडीतमध्ये सात दिवस जनता कर्फ्यू
केतकावळे – श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्‍वरी यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या कोडीत बुद्रुक (ता. पुरंदर) गावात सोमवारी (दि. 20) दोन करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.गावातील बाधितांची संख्या पाचवर पोहोचली असल्याने तहसीलदार रूपाली सरनोबत व सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी गावात बैठक होऊन गावात 7 दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेविका ज्योती जाधव यांनी दिली. सोमर्डी रस्ता, खंडोबाचा माळ याठिकाणी पहिले तीन तर सोमवारचे दिन रुग्ण गावठाणातील असल्यामुळे हे परिसर प्रतिबंधित झोन म्हणून जाहीर केले आहे, अशी माहिती गावचे पोलीस पाटील गणेश बडदे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.