पवना धरणात 13.72 टक्‍के पाणीसाठा 

पवनानगर  – पवना धरणात 13.72 टक्‍के एवढा पाणी साठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आठ टक्‍के पाणीसाठा कमी आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्‍याचे पाण्याचे मुख्य स्त्रोत्र असलेल्या पवना धरणातील पाणीसाठा यावर्षी अत्यंत कमी शिल्लक राहिला आहे. आजअखेर पवना धरण 13.72 टक्‍के (1967.60 फूट) पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणी क्षमता 10 हजार दशलक्ष घनमीटर आहे. पाणी पातळी 1.75 दशलक्ष घनमीटर इतकी आहे.

मागील वर्षी आज अखेर 20 टक्‍के (1978 फूट) इतका पाणी साठा शिल्लक होता. तर मागील वर्षीच्या तुलनेत 8 टक्‍के एवढा पाणीसाठा कमी शिल्लक आहे. तसेच पवना धरणातून दररोज नदीतून 1200 क्‍युसेसने सहा तास पाणी विसर्ग केला जात आहे. पवना धरण परिसरात 98 मि.मी. इतका पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी 290 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद आहे. पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल म्हणाले की, पवना धरणात फक्‍त 13.72 टक्‍केच इतका पाणी साठा शिल्लक आहे. तरी पाण्याची काटकसर करणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.