शिरूर -शिरूर तालुक्यात बुधवारी (दि. 12) तेरा गावांत 48 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
वढू बुद्रूक येथील 68 वर्षीय व सणसवाडी येथील 55 वर्षीय व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शिरूर येथील कोविड केअर सेंटरमधून 62 जणांची तपासणी केली आहे. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधित यांची संख्या आता 757 इतकी झाली आहे.
यामध्ये शिरूर शहर 17, कारेगाव 5, शिरूर ग्रामीण 9, शिक्रापूर 2, रांजणगाव गणपती 3, कवठे 2, टाकळी हाजी 1, मांडवगण फराटा 3, वढू बुद्रूक 1, पाबळ 1, तर्डोबावाडी 2, पिंपळे जगताप 1, धामारी 1 असे एकूण 13 गावांत 48 रुग्ण आढळले आहेत.