लातूर – इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लातूर शहरातील विशाल नगर भागात श्री साई मंदिर लगत भर रस्त्यावर रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. राहुल सुरेश उजळंबे (वय 19, रा. मोती नगर, लातूर) असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भर दुपारी रस्त्यावर घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावर उभा असलेल्या राहुलवर कोयत्याने वार करून त्याला जखमी करण्यात आले. त्यानंतर तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून इतर हल्लेखोरांचा पोलिस शोध घेत आहे.