पुणे  – दिवसभरात 128 नवे करोनाबाधित

पुणे  -दिवसभरात 128 नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 185 बऱ्या झालेल्या नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु मृतांची संख्या वाढली असून, गेल्या 24 तासांत 15 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सहाजण पुण्याबाहेरील आहेत.

आजपर्यंत 4 लाख 90 हजार 574 बाधितांची नोंद झाली असून त्यातील 4 लाख 79 हजार 686 बाधित बरे झाले आहेत. तर 8 हजार 853 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत बाधित असलेल्या रुग्णांमधील 2 हजार 35 बाधित सक्रीय असून, त्यातील 203 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर 285 जणांना ऑक्‍सिजन लावण्यात आले आहे.

संशयितांच्या टेस्ट 30 लाखपार
दिवसभरात 6 हजार 272 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या असून, एकूणच 17 महिन्यांतील संशयितांच्या केलेल्या स्वॅब टेस्ट 30 लाखांपेक्षा जास्त झाल्या आहेत. आजपर्यंत 30 लाख 11 हजार 11 संशयितांच्या स्वॅब टेस्ट झाल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.