गुढी उभारून करोनायोध्यांचा सन्मान करावा 

माजी नगरसेवक सनी निम्हण यांचे आवाहन

पुणे : जगभर थैमान घालणाऱ्या करोना संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्यासाठी करोना योध्दे लढत आहे. त्यांच्या या समर्पनाचा सन्मान करण्यासाठी यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी कारोनायोध्यांसाठी गुढी उभारून त्यांना पुणेकरांनी अनोखी मानवंदना द्यावी असे आवाहन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केले आहे.
त्यासाठी पुणेकरांनी गुढी उभारताना कुटुंबातील मुलांना कोरोना योद्धाची वेषभूषा परिधान करायला सांगावी तसेच गुढीवर कोरोना संदर्भात एक आकर्षक संदेश लावावा अथवा करोना योध्यांच्या हातून गुढी उभारण्यात यावी. तसेच हे फोटो सोशल मिडीयावर पाठवावेत अथवा आमच्याकडे पाठवावेत ते सोशल मिडीयावर प्रसिध्द केले जातील असे आवाहन निम्हण यांनी केले आहे. तसेच या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन करोनाशी पहिल्या आघाडीवर दोन हात करणाऱ्या योध्दांचा सन्मान करावा असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.