शिराळा (प्रतिनिधी) सांगली जिल्ह्यात आज मनपा कार्यक्षेत्रात 97 नवीन रुग्ण, शहरी भागात 5 , ग्रामीण भागात 19 रुग्ण आढळून आले आहेत. सर्व मिळून आज तब्बल एकशे 121 रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या 1762 झालेली आहे. आज दुर्दैवाने सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्याची रुग्णसंख्या 1762 वर पोहोचली आहे, तरी बरे झालेली रुग्णांची संख्या 883 इतकी आहे. आणि उपचारा खाली 822 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 57 रुग्ण आज अखेर मृत्यू पावले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 35 रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. तसेच 81 रुग्ण कोरोना मुक्त ही झाले आहेत.
आज अखेर ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 784, शहरी भागातील 130, मनपा क्षेत्रातील 848 अशी आहे. शिराळा, जत, आटपाडी अग्र क्रमांकावर असले तरी मनपा क्षेत्रानेही 848 रुग्ण संख्येचा आकडा गाठला आहे.
आजचे नवीन पॉझिटिव्ह आटपाडी 5, खानापूर 1, मिरज तालुक्यातील 6,पलूस तालुक्यातील 2, वाळवा तालुक्यातील 1, तासगाव तालुक्यातील 3,सांगली 56, मिरज 41, असा आहे. आजच्या मृतांमध्ये मिरज बेडग येथील 47 वर्षांचा पुरुष, मिरज येथील 55 वर्षांचा पुरुष, सांगली येथील 87 वर्षांची महिला, मिरज येथील 35वर्षांचा पुरुष, पद्माळे येथील 56 वर्षांचा पुरुष, जत येथील 72 वर्षांची महीला. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. आटपाडी 117, जत 121, कडेगाव 55, कवठेमहांकाळ 56, खानापूर 49, मिरज 113, पलूस 81 शिराळा 179, तासगाव 44, वाळवा 99, मनपा 848 अशी आहे.