माहेश्वरी समाजाच्या शिबिरात 120 जणांनी केले रक्तदान

शेवगाव (प्रतिनिधी) -येथील शेवगाव तालुका माहेश्वरी समाज व युवक मंडळाने महेश नवमी निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी 120 दात्यांनी रक्तदान केले आहे.

करोनाच्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत असल्याने सामाजिक दायित्वाच्या भावनेने माहेश्वरी समाज बांधवांनी सर्व कार्यक्रमांना फाटा देऊन रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मंडळाच्या युवक सदस्यानी प्रथम रक्तदान केले आहे. नगरच्या जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.विलास मढीकर, डॉ. गुलशन गुप्ता, स्मिता बडवे यांच्या पथकाने रक्त स्विकारले. एकावेळी तीन जणांना रक्तदानासाठी बोलविण्यात आले. सामाजिक अंतर ठेवून विविध नियमांचे पालन करत शिबिर पार पडले. शेवगाव तालुका माहेश्वरी समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लड्डा, सचिव जगदिश मानधन, माहेश्वरी युवक मंडळाचे अध्यक्ष रमण बिहाणी, सचिव मयूर कलंत्री, बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र बाहेती, सचिव रामदयाळ लाहोटी आदींसह नगरसेवक नंदकिशोर सारडा, डॉ. संजय लड्डा, गोपीकिशन लोहिया, जयप्रकाश धूत, श्रीकांत लड्डा, दगडू बलदवा व कार्यकर्ते या कामी सेवाभावी वृत्तीने योगदान देत आहेत. माहेश्वरी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिश मनियार, दिलीप मुंदडा, भगवान धूत, गौरव बाहेती, नितीन मालाणी आदींचे मार्गदर्शन संघटनेला लाभत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.