ग्रामपंचायत निवडणुकीत मिळाली १२ मते; उमेदवाराने फ्लेक्सद्वारे मानले मतदारांचे अनोखे आभार

पुणे – राज्यभरातील १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर ही निवडणूक तरुणाईच्या हातात गेल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देत नवखे चेहरे निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांना कार्यकर्त्यांनी आणि नातेवाईकांनी फ्लेक्स, मिरवणुकीद्वारे आनंदोत्सव साजरा केला. परंतु, एका उमेदवाराने चक्क बॅनरद्वारे पराभूत केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. 

विकास शिंदे कोनाळीकर याने लातूर जिल्ह्यातील डोंगर-कोनाळी ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिला होता. त्याचे निवडणूक चिन्ह शिट्टी होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये केवळ १२ मते मिळाल्याने विकास पराभूत झाला. परंतु, त्याने निराश न होता देश मला स्वीकारेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. फ्लेक्सचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं असून नेटकरी त्याच्या सकारात्मकतेला दाद देत आहेत.

विकास शिंदे कोनाळीकर याच्या बॅनरवर लिहिले कि, 

वाटलं होत आमचा गाव बरा, पण तुम्ही म्हणाले पसारा भरा. असे म्हणत विकास पुढं म्हणाला, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. समाजाने धिकारल..गावाने नाकारलं..पण आम्हाला देश स्वीकारणार, असा आत्मविश्वास त्यांनी दाखवला आहे. 

आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बारा मतदारानाचे जाहीर आभार मानले आहेत. ना जातीसाठी ना धर्मासाठी आमचा लढा मातीसाठी मला ज्यांनी बारा मते देऊन संघर्ष करण्याची ताकद दिली त्यांचे सात जन्म उपकार फिटणार नाहीत. तुमच्या मताचे देशात नाव करेन, अशा शब्दात विकास शिंदे कोनाळीकर याने आभार मानले आहेत. 

माहितीनुसार, विकास अहमदपूर येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत आहे. काही काळ तो पुण्यातही वास्तव्य करीत होता. गावातील विकासाला हातभार लागावा आणि शिक्षण, रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले जावे या आशेने विकास शिंदे कोनाळीकरने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.