बीजिंग : चीनच्या हुनान या मध्य प्रांतात अतिवृष्टीमुळे दरडी कोशळल्याने 12 जण ठार झाले आहेत. हेंगयांग शहरातल्या विलेंज नावाच्या गावातल्या एका घरावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून किमान 6 जण जखमी देखील झाले आहेत. या भूस्खलनामुळे घराचा काही भाग वाहून देखील गेला असून मातीच्या ढिगाऱ्याखाली 18 जण गाडले गेले आहेत.
बचाव पथकांनी ढिगाऱ्याखालून 12 जणांना जिवंत बाहेर काढले आहेत. डोंगरउतारावर झालेल्या संततधार पावसामुळे या दरडी कोसळल्या आहेत. मदत आणि बचावकार्यासाठी 240 जणांचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. चीनच्या उत्तर आणि नैऋत्येकडील भागात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात आलेल्या वादळाने सुरू झालेला पाऊस अजूनही थांबलेला नाही. गयेमी चक्रिवादळाच्या परिणामामुळे चीनच्या बऱ्याच भागांमध्ये पूरस्थितीचा दोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस अजूनही सुरू असल्यामुळे बऱ्याच भागांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे.