सूरत – भारतीय जनता पक्षाने गुजरात मधील आणखी बारा बंडखोरांना शिस्तभंगाची कारवाई करून पक्षातून निलंबित केले आहे, यातील बहुतेक जण आमदार होते. त्यांना पक्षाने या निवडणुकीत तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने या आधीच रविवारी सात बंडखोरांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केल्याने पक्षातून निलंबित केले आहे.
या आमदारांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणामुळे सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे, असे भाजपने प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी म्हटले आहे. निलंबित करण्यात आलेल्या भाजप आमदारांमध्ये पदरा येथील दिनूभाई पटेल, वाघोडिया येथील मधुभाई श्रीवास्तव आणि वडोदरा जिल्ह्यातील कुलदीप सिंह राऊल यांचा समावेश आहे.पंचमहाल जिल्ह्यातील शाहेरा येथील बी पागी, अरवली जिल्ह्यातील धवलसिंह झाला आणि मेहसाणा येथील रामसिंह ठाकोर यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
आणंद, बनासकांठा आणि महिसागर जिल्ह्यातून प्रत्येकी दोन जणांना निलंबित करण्यात आले आहे. मानवजीभाई देसाई आणि एल ठाकोर हे बनासकांठा येथील आहेत, एस.एम. बांत आणि जेपी पटेल हे महिसागरचे आहेत आणि रमेश झाला आणि अमरशी भाई झाला यांनाही आनंद जिल्ह्यातून निलंबित करण्यात आले आहे.भारतीय जनता पक्षाने यावेळी 38 विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि पक्षप्रमुख पाटील यांच्यासह पक्षाच्या अनेक दिग्गजांनी ही निवडणूक न लढवण्याची घोषणा या आधीच केली आहे.