राजगुरूनगर -खेड तालुक्यात गुरुवारी (दि. 28) बुरसेवाडी एक 58 वर्षीय व्यक्ती करोनाबाधित सापडली असून तालुक्यातील संख्या 20 झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली. खेड तालुक्यात गेल्या तीन दिवसांत खेड तालुक्यात 12 जण करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
खेड तालुक्यात आढळले बाधित हे सर्व मुंबईमधून आलेल्या व्यक्ती व त्यांच्या संपर्कात आलेले जवळचे नातेवाइक आहेत. बुरसेवाडीतील बाधित व्यक्ती मुंबईहू आलेली असून ती नातेवाइकाकडे राहत असून बाधिताच्या 15 जण संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्वांची शुक्रवारी (दि. 29) स्वॅब चाचणी करण्यात येणार असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
मुंबईमधून आलेल्या व्यक्ती नियम पाळत नसल्याने करोनाचा फैलाव होत आहे. स्थानिक कमिटी याबाबत निष्काळजीपणा दाखवत असल्याने गावावर करोनाचे संकट ओढवले जात आहे. कमिटीतील सरपंच हा अध्यक्ष असतो तलाठी उपाध्यक्ष व ग्रामसेवक सचिव आहे मात्र त्यांच्या हलगर्जीपणामुळे गावागावात रुग्ण वाढत आहेत. ग्रामपंचायत सतर्कता बाळगत नाही.
गावातील नागरिकांनी सतर्क राहून बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तीचा अहवाल आरोग्य विभागाकडे द्यावा, गावातील कमिटीला सूचित करावे. नियमांचे पालन करावे बाहेरगावावरून गावी आलेल्या व्यक्तींनी क्वारंटाइन होऊन नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.