बेल्हे -आळेफाटा (ता. जुन्नर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आळे अंतर्गत कणसे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे तात्पुरता 12 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. पुढच्या 2 दिवसांत 50 बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास आळेफाटा परिसरातील करोना संशयित रुग्णावर उपचारदेखील करण्यात येणार आहेत.
आळे येथील प्राथमिक केंद्रामार्फत करोनाविषयी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. याबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पुणे-मुंबईवरून आलेल्या नागरिकांना आपल्या घरीच थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे, मुंबईवरून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन करून घेणे बंधनकारक आहे. अशा नागरिकांनी घरीच थांबावे. आळेफाटा येथील कणसे हॉस्पिटलमध्ये तात्पुरता 12 बेडचा आयासोलेशन वॉर्ड बनवला आहे. पुढच्या दोन दिवसांत 50 बेडचे नियोजन केले जाणार आहे. याठिकाणी करोना संशयित रुग्णांवर उपचार केला जाणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी.
– ज्ञानेश्वर पाटील,
वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, आळे.