कोलकता – भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. ती कारवाई करताना भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दोन स्वतंत्र घटनांमध्ये घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले. भारत-बांगलादेशत सीमेलगत सज्ज असणाऱ्या बीएसएफच्या सतर्क जवानांनी संशयास्पद हालचाली हेरल्या.
त्यानंतर तातडीने कारवाई करत जवानांनी घुसखोरांना पकडले. त्यामध्ये 8 महिलांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी बांगलादेशी दलालांची मदत घेऊन भारतात शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
बांगलादेशी घुसखोरांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न पाकिस्तानबरोबरच बांगलादेश सीमेवरूनही केले जातात. तसे प्रयत्न बीएसएफचे सतर्क जवान सातत्याने हाणून पाडतात.