लखनऊ – हॅलो.. मी बॅंकेतून बोलतोय, पेटीएम मधून बोलतोय, असे म्हणत
वैयक्तीक, बॅंक अकाउंटसंबंधी माहिती घेत अनेकांची फसवणूक केली जाते. असाच प्रकार उत्तर प्रदेशातील लखनऊ मध्ये घडला आहे. फोन करून तरूण-तरूणींची फसवणूक करणाऱ्या 12 जणांच्या टोळीला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लखनऊचे एएसपी विशाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले 12 जण बॅंक मॅनेजर बोलतोय म्हणत नोकरीसाठी वेबसाइटवर अर्ज केलेल्या बेरोजगार तरूण-तरूणींना फोन करत होते. त्यांना फिशिंग लिंक पाठवून
त्यांची फसवणूक करत होते. त्या 12 जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे असे सिंह यांनी सांगितले.
फसवणुकीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी खालील उपाय करा-
– बॅंक अकाउंट संबंधीत माहिती कोणालाही देऊ नका.
– बॅंक खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावरील ओटीपी शेअर करू नका.
– आपला बॅंक खाते क्रमांक, एटीएम क्रमांक, युपीआय आयडी गोपनीय ठेवा.
– लालस दाखवणाऱ्या कोणत्याही ऑफर्सला भुलू नका.
ऑनलाइन फ्रॉड करने वाले एक गैंग के 12 लोगों को गिरफ़्तार किया गया है। ये लोग बेरोज़गार लड़के / लड़कियां जो किसी वेबसाइट पर जॉब के लिए आवेदन देते थे, उन्हें बैंक मैनेजर बनकर कॉल लगाते थे और उन्हें फिशिंग लिंक भेजकर फ्रॉड करते थे : विशाल विक्रम सिंह एएसपी, एसटीएफ लखनऊ #उत्तरप्रदेश pic.twitter.com/9ahOa0bwxf
— ANI_HindiNews (@AHindinews) October 14, 2020