प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -पुणे व पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, यात 42 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. या फेरीत विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 21 हजार 534 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत.
अकरावी प्रवेशासाठी 317 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 11 हजार 430 जागा आहेत. प्रवेशासाठी 1 लाख 555 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात अर्जाचा भाग-1 भरणारे पात्र विद्यार्थी 84 हजार 615 होते. तर अर्जाचा भाग-2 भरणारे पात्र विद्यार्थी 84 हजार 606 होते. यातील 69 हजार 116 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले आहेत.
विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचे पसतीक्रम नोंदविणे बंधनकारक होते. त्यानुसार पहिल्या पसंतीक्रमानुसार 24 हजार 718 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. त्यानंतर दुसरा-6,820, तिसरा-3,515, चौथा-2,411, पाचवा-1,667, सहावा-1,185, सातवा-889, आठवा-640, नववा-492, दहावा-372 या पसंतीक्रमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आलेला आहे.
प्रवेशासाठी सर्वांत जास्त विज्ञान शाखेसाठी, तर सर्वात कमी एचएचव्हीसी शाखेसाठी जागा उपलब्ध झाल्या आहेत. पहिल्या नियमित फेरीत कला शाखेसाठी मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमांसाठी अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे.
प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसल्यास ते पुढील फेरीची वाट पाहू शकणार आहेत. 7 ऑगस्टला दुसऱ्या नियमित फेरीसाठी रिक्त जागा माहिती प्रसिद्ध करण्यात येईल.
शाखा व माध्यमनिहाय प्रवेश
शाखाप्रवेश जाहीर (इंग्रजी)प्रवेश जाहीर (मराठी)प्रवेश जाहीर (हिंदी)एकूण प्रवेश जाहीर
कला1,4932,704नाही4,197
वाणिज्य11,4324,709नाही16,141
विज्ञान21,534नाहीनाही21,534
एचएसव्हीसी30551418837
एकूण34,7647,9271842,709