अहिल्यानगर (प्रतिनिधी) – राज्य शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे आणि जिल्हा प्रशासनाने प्रभाविपणे राबविलेल्या विविध योजनांमुळे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबत कृषी विकासाला गती मिळण्यास मदत झाली आहे.
कांदा अनुदान योजना २०२२-२३ अंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्यात आले. जिल्ह्यात ५५ हजार ३६८ लाभार्थी असून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे रुपये ११५ कोटी ९६ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या १ लाख ५०० शेतकऱ्यांना बँकांकडून घेतलल्या अल्प मुदत पीक कर्जाची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये ५० हजार या कमाल मर्यादेत रुपये ३६२ कोटी २३ लाख एवढा प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये खरीप व रब्बी हंगामात गेल्या तीन वर्षात ५ लाख १३ हजार ३७ शेतकऱ्यांना ११ अब्ज ६५ कोटी ४७ लाख ९२ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली.
प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील ३७ हजार ७१ शेतकऱ्यांना ६२ कोटी ४५ लाख २१ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली.
तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षात ७३२ शेतकऱ्यांना १४ कोटी ७ लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान अंतर्गत ३०८ शेतकऱ्यांना ६ कोटी ६ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले.
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनांवर गेल्या तीन वर्षात २६ कोटी ५४ लाख ४४ हजार रुपये खर्च करण्यात आले.
कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत गेल्या ३ वर्षात जिल्ह्यातील १८ हजार ६३३ शेतकऱ्यांना कृषी औजारे खरेदीसाठी १०८ कोटी ५३ लक्ष ५० हजार रुपयांचे अनुदान वितरित.
प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात ९८७ प्रकल्पांना ३८ कोटी ८९ लाख २४ हजार रुपयांचे अुनदान वितरित.
राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक सुक्ष्म योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील ३६ हजार ५४ लाभार्थ्यांना ८७ कोटी २ लाख ९१ हजार ५७ रुपयांचे अनुदान वितरित.
फळपिके, फुलपिके, भाजीपाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड, प्रक्रिया व निर्यात क्षेत्रातल वाव लक्षात घेऊन राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाद्वारे ३ हजार ७०७ लाभार्थ्यांना ३४ कोटी ६१ लाख ७८ हजारांचे अनुदन वितरीत करण्यात आले.
तर,राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तीन वर्षात ५ हजार १५६ शेतकऱ्यांना ४७ कोटी ९३ लाख रुपयांचा अनुदानाचा लाभ झाला.
कृषी विभागाच्या विविध योजनांमुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्रात अनुकूल प्रयोग होत असनू त्यातून शेतकऱ्यांना लाभ होत आहे. कृषी अवजारे, निविष्ठा यांची उपलब्धता आणि सिंचन सुविधेमुळे शेतकरी पारंपरिक शेती ऐवजी आधुनिक शेतीकडे वळू लागल्याने उत्पादनातही वाढ होत आहे.