“जीआरएस’ प्रणाली प्रशासनाला आली जाग
पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने “जीआरएस’ प्रणालीद्वारे नकाशे, सर्व्हे आणि ईआरपी करण्यासाठी 116 कोटी रुपयांची निविदा काढली होती. ही निविदा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रद्द केली. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या निविदेविषयी शंका उपस्थित करत आक्षेप घेतला होता. त्यावर कार्यवाही करत आयुक्तांनी ही निविदा रद्द केली आहे.
पिंपरी चिंचवड शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील शेवटच्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने 2007 मध्ये कार्यालयीन कामकाजात भौगोलिक सूचना प्रणालीचा वापर करण्याच्या दृष्टीने स्वतंत्ररित्या भौगोलिक सूचना प्रणाली (जीआरएस) प्रकल्पाचे कामकाज केले. त्यानंतर 2010 मध्ये ई गव्हर्नस प्रकल्पांतर्गत एंटरप्राईस रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी) प्रणाली प्रकल्पाचे कामकाज सुरू केले. दोन्ही प्रणाली स्वतंत्ररित्या तयार केल्या होत्या.