मुंबई – मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी अर्ज मागे घेतते. त्यानंतर आता लोकसभा निवडणूकीसाठी या मतदारसंघातून 116 उमेदवार मैदानात उरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापैकी गुरुवारी विदर्भात पहिल्या टप्प्यात 7 मतदारसंघात मतदान झाले असून आता तीन टप्प्यात मतदान शिल्लक आहे. मुंबईत चौथ्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून 18, उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून 21, उत्तर पूर्व (ईशान्य) 27 व उत्तर मध्य 20, दक्षिण मध्य 17, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवार आता आपले नशीब आजमवणार आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे व मुंबई शहर जिल्हा प्रसिध्दी माध्यम कक्षामार्फत देण्यात आली आहे.
मुंबईच्या प्रमुख लढती
1 – दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (शिवसेना), मिलिंद देवरा (कॉग्रेस)
2 – दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे (शिवसेना), एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस)
3 – उत्तर मध्य मुंबई – पुनम महाजन (भाजप), प्रिया दत्त (कॉंग्रेस)
4 – उत्तर पश्चिम – गजानन किर्तीकर (शिवसेना), संजय निरूपम (कॉंग्रेस)
5 – उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी (भाजप), उर्मिला मातोंडकर (कॉंग्रेस)
6 – ईशान्य मुंबई – मनोज कोटक (भाजप), संजय पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)