नवी दिल्ली – बिहार मध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला एकूण 3733 उमेदवार उभे होते, त्यातील 1157 उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत असे एका पाहणीत आढळून आले आहे.
निवडणूकीशी संबंधीत निरीक्षणे नोंदवणाऱ्या एका संस्थेने ही माहिती प्रसृत केली आहे. सध्याच्या निवडणूक नियमांनुसार उमेदवाराला त्याच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्हांची माहिती आपल्या उमेदवारी अर्जात द्यावी लागते. ती माहिती वेबसाईटरही उपलब्ध करून दिली जाते. त्या माहितीचे संकलन करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगालाही उमेदवाराच्या या गुन्हेगारी पार्श्वभूमीची व त्यांच्यावरील खटल्यांची माहिती वृत्तपत्रांमध्ये जाहीरात प्रसिद्ध करून जनतेसाठी जाहीर करण्याची पद्धत अवलंबली जात आहे. त्याद्वारे जनतेलाही आपला उमेदवार निवडण्याच्या संबंधात निर्णय घेणे सोपे होणार आहे. त्यानुसार जी माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रसारीत करण्यात आली आहे त्यानुसार बिहार मध्ये एकूण 1157 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत असे स्पष्ट झाले आहे.