तळेगावात 1,111 दाम्पत्यांची महापूजा

डोळसनाथ महाराज मंदिरात साकडे

तळेगाव दाभाडे – कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांवरील महापुराचे संकट दूर व्हावे तसेच संपूर्ण राज्यावर निसर्गाची कृपादृष्टी राहावी, यासाठी तब्बल 1,111 दाम्पत्यांनी सामुदायिक महापूजा घालून भगवान श्री सत्यनारायण यांना साकडे घातले. माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या पुढाकाराने ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात रविवारी (दि. 18) या सामुदायिक सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. मावळातील पावसाने साथ दिल्यामुळे सुखशांती लाभावी म्हणून या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

महापूजेच्या निमित्ताने शेळके परिवाराच्या वतीने एका पूरग्रस्त कुटुंबाला प्रातिनिधीक स्वरुपात एक गाय व एक म्हैस देण्यात आली. मावळातील प्रत्येक शहराने व गावानेही एक गाय व एक म्हैस गरीब कुटुंबांसाठी मदत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सुनील शेळके फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांसाठी ब्लॅंकेट व पाण्याच्या बाटल्या पाठवण्यात आले आहे.
श्री क्षेत्र गिरनार येथील थोर सत्पुरुष प. पू. प्रमोद केणे, ह.भ.प. नितीन महाराज काकडे यांची विशेष उपस्थिती महापुजेस लाभली.

त्यावेळी मावळ तालुक्‍याचे माजी आमदार दिगंबर भेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ टिळे, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, तळेगावचे नगरसेवक संदीप नाना शेळके, सुशील सैंदाणे, गणेश काकडे, संतोष शिंदे, अमोल शेटे, नीताताई काळोखे, वैशालीताई दाभाडे, इंदरशेठ ओसवाल, युवासेना प्रमुख अनिकेत घुले तसेच एकनाथ पोटफोडे आदी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×