वाराणसीमध्ये मोदींच्या विरोधात तामिळनाडूचे 111 शेतकरी 

तिराचिराप्पल्ली – तामिळनाडूतील मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार असलेल्या वाराणसी मतदारसंघातून तामिळनाडूतील 111 शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे ठरवले आहे. तामिळनाडूतील शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी शनिवारी ही माहिती दिली. अय्याकन्नू हे “नॅशनल साऊथ इंडियन रिव्हर्स इंटर लिंकिंग फार्मर्स असोसिएशन’चे अध्यक्ष आहेत.

भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये तामिळनाडूतील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचा समावेश करावा. त्यामध्ये शेतीमालाला किफायतशीर दर मिळण्याचाही समावेश आहे. या मागण्यांसाठी तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी 2017 साली दिल्लीमध्ये 100 दिवस आंदोलनही केले होते. ज्या दिवशी या मागण्या मान्य केल्याचे आश्‍वासन दिल्यास पंतप्रधान मोदींच्याविरोधात निवडणूक लढवण्याची योजना मागे घेतली जाईल, असे अय्याकन्नू म्हणाले.

द्रमुक आणि अद्रमुकसारख्या पक्षांनी तामिळनाडूतील शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचे आश्‍वासन दिले आहे. पण तेवढे पुरेसे नाही. पंतप्रधान मोदींनी शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासनही दिले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य व्हायला पाहिजेत, असेही अय्याकन्नू म्हणले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here