Pune : सोमवारपासून दररोज 1,100 पीएमपी धावणार

पुणे – शहरातील विविध व्यवहार अनलॉक झाल्याने नागरिकांची वर्दळ वाढत आहे. यामुळे पीएमपी बसेसमधील गर्दी देखील वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पीएमपी बसेसच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. सोमवारपासून (दि.2) दररोज सुमारे 1,100 बसेस धावणार आहेत. मागील काही दिवसांपासून निर्बंध शिथिल केल्याने पीएमपी बसेसमधील प्रवाशांची गर्दी वाढत आहे.

विशेषतः काही मार्गांवर प्रवासी संख्या अधिक असून, त्या तुलनेने मात्र बसेसची संख्या कमी असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. या पार्श्‍वभूमीवर काही प्रमुख मार्गांवर 100 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.