चीनमधील खाणीत अडकलेल्या 11 जणांची सुटका

बीजिंग – चीनच्या शांदोंग प्रांतातल्या सोन्याच्या खाणीत गेल्या दोन आठवड्यांपासून अडकलेल्या 11 खाण कामगारांची आज सुटका करण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वी खाणीत स्फोट झाल्यानंतर हे कामगार खाणीतच अडकून पडले होते. बचाव पथकाने आज या खाणीतून आणखी दोन कामगारांची सुटका केली, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

आज सकाळी या खाणीतील पहिल्या कामगाराची सुटका केली गेली होती. हा कामगार गेल्या दोन आठवड्यांपासून खाणीत अडकून पडलेला असल्यामुळे अतिशय मरणासन्न अवस्थेत होता. खाणीतून बाहेर काढल्यानंतर या कामगाराला उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या 633 लोक आणि 407 उपकरणे बचाव कामासाठी कार्यरत आहेत.

या खाणीमध्ये 10 जानेवारीला स्फोट झाला तेंव्हा जमिनीखाली 600 मीटरवर 23 खाण कामगार अडकले होते. बचाव पथक आज सकाळी याठिकाणापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. त्यावेळी केवळ 10 जण जिवंत असल्याचे आढळून आले. मात्र हे सर्वजण शारीरिक आणि मानसिकरित्या खचलेले होते. उर्वरित कामागारांचा मृत्यू झाला असल्याचे समजते आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.