नवी दिल्ली – करोनाबाधितांचा 17 लाखांचा टप्पा भारताने आज दुपारी बाराच्या सुमारास ओलांडला. त्यावेळी 17 लाख एक हजार 307 रुग्णांची नोंद झाली. त्यावेळी आरोग्य मंत्रालयाने सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार करोनामुक्त झालेल्यांची संख्या 11 लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर देशात गेल्या 24 तासांत 57 हजार 118 नवे बाधित सापडले.
करोनामुळे मरण पावलेल्यांच्या संख्येत शुक्रवारी एका दिवसांत 764 जणांची भर पडली. त्यामुळे ती संख्या 36 हजार 583 वर पोहोचली. करोनाचे दुपारी 12 वाजेपर्यंत सक्रिय बाधित पाच लाख 67 हजार 405 नोंदले गेले होते. करोना बाधितांचा बरे होण्याचे प्रमाण 64.47 टक्के आहे. तर मृतांचे प्रमाण 2.15 टक्के एवढे खाली आले आहे. सलग तिसऱ्या दिवशी बाधितांची संख्या 50 हजारपेक्षा अधिक होती.
आयसीएमआरने 31 जुलै रोजी पाच लाख 25 हजार 689 चाचण्या घेतल्या. त्यामुळे चाचण्यांची एकूण संख्या एक कोटी 93 लाख 58 हजार 659 वर पोहोचली.