कर्नाटकमधील भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू; मृतांमध्ये 9 महिलांचा समावेश

बंगळूर – कर्नाटकमध्ये शुक्रवारी एका भीषण अपघातात 11 प्रवासी मृत्युमुखी पडले, तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये 9 महिलांचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

कर्नाटकमधील काही रहिवासी मिनी-बसमधून गोव्याला निघाले होते. त्यावेळी धारवाड शहरालगत त्यांच्या मिनी-बसची समोरून आलेल्या टिपरशी जोरदार धडक झाली. अपघातानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. त्यामध्ये स्थानिकही सहभागी झाले.

जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मृतांमध्ये मिनी-बसच्या चालकाचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.