कैरो – इजिप्तमध्ये रविवारी झालेल्या एका रेल्वे अपघातात 11 जण ठार झाले आहेत. कल्युबिया प्रांतातील बन्हा येथे हा अपघात घडला. प्रवासी ट्रेनचे चार डबे या अपघातात रुळावरून घसरले. त्यात 11 जण ठार, तर 98 जण जखमी झाले आहेत.
ही गाडी कैरोहून मन्सौरा गावाकडे जात असताना हा प्रकार घडला. या गाडीचे जे डबे रुळावरून घसरले ते उलटून अन्यत्र पडले. त्यातील प्रवाशांनी जिवाच्या आकांताने तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियातून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. इजिप्तमध्ये अलीकडच्या काळात झालेला हा मोठा अपघात आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघाताची चौकशी केली जात आहे.