अहमदाबाद : शहरात बेकायदा राहणाऱ्या 11 बांगलादेशीयांना पोलिसांनी अटक केली.
हे बांगलादेशी चांदोला तलावा जवळील इशानपूर भागात रहात होते. पोलिसांच्या विशेष कारवाई गटाने त्यांना पकडले. त्यांना त्यांच्या मायदोत परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे बांगलादेशी येथे बेकायदा रहात होते. ते मजूरी करत होते. त्यांना भारतीय असल्याचा कोणताही पुरावा दाखवता आला नाही. त्यांचा कोणत्या गुन्हेगारी कारवायात सहभाग आहे का? याचा तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.