करोनाग्रस्तांची संख्या 5 हजार 270 वर
शिराळा (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यात बुधवारी मनपा विभागात 122 नवीन रुग्ण, शहरी विभागात 24 नवीन रुग्ण आणि ग्रामीण भागात 134 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याच्या रुग्णसंख्या 280 ची भर पडल्याने रुग्णसंख्या 5 हजार 270 वर पोहोचली. आहे.
एकूण बाधित रुग्णांपैकी 2 हजार 781 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. बुधवारी उपचाराखाली 2 हजार 313 रुग्ण होते. आतापर्यंत जिल्ह्यातील 176 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी 489 रुग्ण मुक्तही झाले आहेत.
मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आज अखेर 3 हजार 223, शहरी भागात आज अखेर 361, ग्रामीण भागात आज 1 हजार 680 अशी आहे. बुधवारी टेस्ट 1 हजार 268 घेण्यात आल्यापैकी 157 पॉझिटिव्ह आढळून आल्या. तर 1363 अँटीजन टेस्ट पैकी 127 पॉझिटिव्ह आल्या.
तालुकानिहाय आजची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आटपाडी 8, जत 3, कडेगाव 12, कवठेमहांकाळ 7, खानापूर 4, मिरज 27, पलूस 7, शिराळा 9, तासगाव26, वाळवा 45, सांगली 82, मिरज 40 अशी आहे.
बुधवारच्या अहवालातील मृतांमध्ये सांगली येथील 65, 64, 69 वर्षांचे पुरुष. भोसे येथील 38 वर्षांचे पुरुष, कुपवाड येथील 46, 68 वर्षांचे पुरुष, कोकरुड येथील 65 वर्षांचे पुरुष, धोंडगे वाडी 65 वर्षांचे पुरुष, मिरज येथील 33 वर्षांचे पुरुष, वसगडे येथील 85 वर्षांचे पुरुष असा समावेश आहे.
तालुकानिहाय आज अखेर पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आटपाडी 213, जत 206, कडेगाव 104, कवठेमहांकाळ 190, खानापूर 101, मिरज 433,पलूस 166, शिराळा 236, तासगाव 159, वाळवा 239, मनपा 3223 असे आहेत. वाळवा, शिराळा, आटपाडी तालुका जिल्ह्यात अग्रक्रमांकावर आहेत.