शिरूर : शिरूर तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या सुरू असून, आज शिरूर तालुक्यातील ७ गावात ११ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून शिरूर तालुक्यात कोरोणाचा आकडा आता ३३३ एवढा झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
तर आज शहरात प्रीतम प्रकाश नगर येथील 36 वर्षीय कंपनी कामगार कोरोना पॉझिटिव आढळला आहे. काल शिरूर शहरातून पाठवण्यात आलेल्या ६० जणांपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला असुन ५९ जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव आल्याने शिरूर शहरासह तालुक्याला आज मात्र थोडा दिलासा मिळाला आहे तर शिरूर कोविड केअर सेंटर येथून शिरूर शहरातील १२ जणांचे कोरोना तपासणीकरिता नमुने पाठवण्यात आले असल्याची माहिती ती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे.
शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३३३वर पोहचला असुन शहरातील रुग्ण संख्या ६२ यामध्ये ३रुगणांचा मृत्यू झाला आहे. तर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावामध्ये एकुण रुग्ण संख्या २७१ यापैकी ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज नव्याने सापडलेल्या रुग्णामध्ये शिरूर शहरात १ व तालुक्यातील शिक्रापूर ३,कोरेगाव भिमा २, मांडवगण २ , धानोरे १, दरेकर वाडी १,मलठण १ असे सात गावात ११ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली