जुन्नर – राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बंडखोरी केलेले तुषार थोरात यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता 11 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी सारंग कोडलकर यांनी माहिती दिली. त्यानुसार निवडणूकीच्या रिंगणात राहिलेले उमेदवार पुढीलप्रमाणे शरद सोनवणे, अतुल बेनके, अशोक बाळसराफ, साहेबराव शिंदे, आशा बुचके, सुखदेव खरात, राजाराम ढोमसे, विनोद केदारी, रोहिदास देठे, आशा तोतरे, राजेंद्र आल्हाट या उमेदवारांमध्ये निवडूक रंगणार आहे.