जळगाव – करोनाची लाट ओसरल्यामुळे स्थानिक निवडणुकांना राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जळगावमध्ये भाजपला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या 11 नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी सेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील सुद्धा उपस्थितीत होते.
उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधून प्रवेश दिला आहे. मुक्ताई नगर आणि बोधवड नगरपालिकाचे भाजप नगरसेवक हातावर शिवबंधन बांधले आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर अनेक भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. पण, खडसेंचे समर्थक असलेले नगरसेवकच आता शिवसेनेत दाखल होत असल्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहे.