गुजरातमध्ये अवैध वास्तव्य करणाऱ्या 11 बांगलादेशींना अटक

अहमदाबाद : गुजरातमध्ये अवैध वास्तव्य करणाऱ्या 11 बांगलादेशी नागरिकांना शनिवारी अटक करण्यात आली. ती कारवाई अहमदाबाद शहरात करण्यात आली. संबंधित बांगलादेशी मजुरीकाम करत होते. संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून ते कुठलीही कागदपत्रे उपलब्ध करून शकले नाहीत. चौकशीतून ते बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. गुन्हेगारी स्वरूपाच्या कुठल्या कारवायांत ते सामील होते का याचा तपास आता करण्यात येत आहे.

कसून चौकशीनंतर त्यांची बांगलादेशला परत पाठवणी केली जाणार असल्याचे समजते. सध्या नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकावरून देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे घुसखोरांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमधील घडामोड घडली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.