काबुल- तालिबानी गनिमांनी देशाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील भागात असलेल्या सुरक्षा चौक्यांवर हल्ले करून 11 लष्करी जवान आणि पोलिसांना ठार मारले आहे. त्या देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.
अफगाणिस्तानात तालिबान आणि तेथील सरकार मध्ये शांतता कराराचा प्रस्ताव विचाराधिन आहे. त्यासाठी अध्यक्ष अश्रफ घनी यांनी तालिबान्यांशी चर्चा करण्यासाठी 21 जणांच्या समितीची घोषणाही केली आहे. याच पार्श्वभूमीवर तालिबान्यांचे हे हल्ले पुन्हा सुरू झाल्याने शांतता चर्चेचे भवितव्य अधांतरी गेले आहे.
दरम्यान हे हल्ले केल्याचा दावा मात्र तालिबानने केलेला नाही. या दोन हल्ल्यांपैकी एक हल्ला झाबुल प्रांतात रविवारी रात्री झाला त्यात सहा जण ठार झाले तर दुसरा हल्ला उत्तरेकडील बाघलान भागात झाला त्यात पाच जण मारले गेले. आज सोमवारी काबुल शहरातील एक बॉम्ब हल्ला झाला त्यात किमान चार जण जखमी झाले आहेत.