11 गावांत कर आकारणी लवकरच…

महापालिकेच्या दरांप्रमाणे भरावा लागणार मिळकतींचा कर

पुणे – हद्दीत समाविष्ट 11 गावांमधील मिळकतींची कर आकारणी महापालिकेच्या दरांप्रमाणे करण्यास मुख्यसभेने मान्यता दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव प्रशासनाने महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. ती मिळताच; या गावांची कर आकारणी निश्‍चित करण्याचे काम सुरू केले जाणार आहे.

पालिकेत समाविष्ट झालेल्या या 11 गावांमधील तब्बल 1 लाख 20 हजार मिळकतींच्या नोंदी संबंधित ग्रामपंचायतींच्या दप्तरांमध्ये आहेत. त्या आधारावर ही कर आकारणी केली जाणार असल्याचे महापालिका कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त विलास कानडे यांनी सांगितले. ही गावे महापालिकेत ऑक्‍टोबर 2017 मध्ये आली होती. तर ही गावे येण्यापूर्वी ग्रामपंचायतीने गावांमध्ये मिळकतकर बिलांचे वाटप केले होते. त्यानुसार, मागील वर्षाची बिले ग्रामपंचायतीच्या दराने होती. मात्र, आता या वर्षापासून ही बिले महापालिकेच्या दरानुसार दिली जाणार आहेत.

बिलांच्या नोटीस महिनाभरात देणार
संबंधित गावांतील मिळकतींच्या नोंदीनुसार, पालिकेच्या दराने कर आकारणी करून त्याच्या नोटीस या मिळकतधारकांना देण्यात येणार आहेत. त्यानुसार, कर मंजूर आहे किंवा नाही हे मिळकतकधारकांना महापालिकेस कळवावे लागेल. कर मंजूर नसल्याचे तसेच ठराविक मुदतीत पालिकेस कळविले नाही, तर ते बिल मान्य आहे, असे समजले जाणार आहे. तर ज्यांना ते मान्य नाही त्यांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे या नोंदीनुसार, कर आकारणी अंतिम करून त्याच्या नोटीस पुढील महिनाभरात या गावांमधील नागरिकांना पाठविण्यात येणार आहेत.

इतर मिळकतींचे प्रत्यक्ष मोजमाप
ज्या मिळकतींची नोंद ग्रामपंचायत दप्तरामध्ये नाही, त्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांनाही नोटीस बजावून मिळकतकर निश्‍चित केला जाणार आहे. ही गावे पालिकेत आल्यानंतर अनेक नवीन बांधकामे झाली आहेत. तर अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांनाही कर आकारणीत आणल्यास पालिकेस मोठा आर्थिक फायदा होणार आहे. अशा सुमारे 30 ते 40 हजार मिळकती असण्याची शक्‍यता प्रशासनाने वर्तविली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)