डहाणू – लॉकडाऊनमध्ये घरची परिस्थिती हलाखीची झाल्यामुळे दहावीत शिकणाऱ्या मुलाने घरी हातभार लावण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. मात्र कामाच्या ठिकाणी व्यवस्थापकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याच्या कारणावरून या मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येपुर्वी या मुलाने सुसाईड नोट लिहली आहे.
प्रदीप राज्या घरट, वय 16 असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. प्रदीपने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने ‘आई-बाबा मला माफ करा, तुमची खूप आठवण येते, काळजी घ्या! मित्रांचीही खूप आठवण येते’ असी भावनिक वाक्य लिहले आहे. तसेच व्यवस्थापकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचे त्याने लिहिलेल्या चिठ्ठित नमूद केले आहे.
या आत्महत्येप्रकरणी कासा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास कासा पोलीस करत आहेत. प्रदिपच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.