ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल्सच्या अष्टपैलू विदयार्थ्यांनी सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत ९५.८% गुणांसह उत्कृष्ट टक्केवारी मिळवली आहे.
ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षा, २०२२ मध्ये प्रशंसनीय १००% निकालासह कठोर परिश्रमांचे उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ रुपाली ढमढेरे म्हणाल्या, “शिक्षक आणि विद्यार्थ्यांची सामूहिक मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा हे याचा हा परिणाम आहे. विद्यार्थ्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आम्ही विद्यार्थी, त्यांचे कुटुंब आणि शिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, ज्यांनी विद्यार्थ्यांच्या या यशात आपले योगदान दिले आहे.”
ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, पुण्याचे टॉपर्स आहेत:
१. शेहजीन सुर्वे: ९५.८%
२. जैनम दुधेडिया: ९४.६%
३. सोनल पवार : ९४.२%