श्रीलंकेतील बॉम्बस्फोट प्रकरणी 106 संशयितांना अटक

तामिळी माध्यमाच्या एका शिक्षकाचाही समावेश

कोलोंबो – श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी झालेल्या आत्मघातकी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आतापर्यंत 106 संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये तामिळ माध्यमाच्या एका शाळेतील शिक्षकाचाही समावेश आहे. या शिक्षकाकडून 50 सीम कार्ड आणि अन्य गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

कालपितिया पोलिस आणि श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या संयुक्‍त कारवाईत या शिक्षकाला अटक करण्यात आले आहे. वावुनिया गावामध्ये पोलिस आणि लष्कराने केलेल्या संयुक्‍त कारवामध्ये अन्य 10 संशयितांनाही अटक करन्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे तीन तास केलेल्या शोधमोहिमेसाठी या परिसरातील रस्तेही बंद करण्यात आले होते.

दरम्यान गेलमधील दामगेदारा भागात आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली. “एनटीजे’च्या माध्यमातून एक शाळाही चालवली जाते, असे समजल्यावर येथे शोधमोहिम घेतली गेली. अटक केलेला एक जण हा या शाळेचा मुख्याध्यापक तर दुसरा एक डॉक्‍टर आहे.

श्रीलंकेने शनिवारी “एनटीजे’ आणि इसिसशी संबंधित एका फुटीरगटावर बंदी घातली. शुक्रवारी केलेल्या शोधमोहिमेदरम्यानच्या चकमकीत 15 जण ठार झाले होते. त्यात 6 लहान मुले आणि 3 महिलांचाही समावेश आहे. तर 3 दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोटाने स्वतःला उडवून दिले. चकमकीच्या ठिकाणी मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.