नगर – शहरातील झेंडीगेट परिसरातील कुरेशी मोहल्ला, आंबेडकर चौकातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 105 किलो गोमास जप्त केले करूण 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दुसऱ्या कारवाईत कोतवाली पोलिसांनी कत्तलीसाठी जानाऱ्या 12 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिऱ्यादीवरून दोघांजनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सहा लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत कदीर शमशु कुरेशी (वय-35, रा. कुरेशी मोहल्ला, आंबेडकर चौक, नगर) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार झेंडीगेट परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये जिवंत गायीचे कत्तल करून गोमास विक्रीहोत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार सचिन आडबल, मन्सुर सय्यद, संतोष लोंढे, रवींद्र कर्डीले, प्रकाश गणपत वाघ, कमलेश पाथरुट तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे रामचंद्र पालवे, प्रमोद लहारे यांच्या पथकाने सापळा रचवून कारवाई केली.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात सचिन आडबल यांच्या फिर्यादीवरून कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या कारवाई शहरातील झेंडीगेट परिसरात बुथ हॉस्पिटल जवळ कत्तलीसाठी जाणाऱ्या 12 गोवंश जनावरांची सुटका कोतवाली पोलिसांनी केली आहे. या कारवाईत 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका जणाविरोद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अमीन इसाक सय्यद (वय-28, रा. लोहगाव, ता. नेवासा) यास ताब्यात घेतले आहे. शहर पोलीस उपाअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघा यांना मिळालेल्या माहितीनुसार झेंडीगेट परिसरात (एम.एच.16.सी.सी. 4873) या वाहनातून कत्तलीसाठी घेवूनजात असल्याचे समजले. त्यानुसार एपीआय पवार, पो.ना. शाहीद शेख, प्रमोद लहारे, शाहीद शेखे, गोरे यांच्या पथकाने बुथ हॉस्पिटल जवळ सापळा रचवून कत्तलीसाठी जाणारे 12 गोवंश जनावरांची सुटका केली. हे जणावरे पारनेर येथील एका पांजरपोळात सोडण्यात आले असून टेंम्पो कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.