जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 जागांसाठी गुरुवारी दिवसभरात 104 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी (दि. 4) अंतिम मुदत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
आघाडी आणि युतीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
पुणे शहरामध्ये विधानसभेचे 8 मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये गुरुवारी कसबा पेठमधून 5 उमेदवार, पुणे कॅन्टोन्मेंटमधून 7, हडपसरमधून 8, पर्वतीमधून 6, खडकवासलामधून 3, कोथरूडमधून 2, शिवाजीनगरमधून 4 आणि वडगावशेरी मतदारसंघातून 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.