102 कोटी 53 लाखांच्या पाणी योजनांना मान्यता

मंचर- खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे व शिवसेना जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्या प्रयत्नांतून शिरुर लोकसभा मतदार संघातील 102 कोटी 53 लाख रुपयंच्या पाणी पुरवठा योजनांना राज्य शासनामार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यातून मान्यता देण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी दिली.
खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध पाणी योजनांना मान्यता मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, बाबाजी काळे, देवराम लांडे, गुलाब पारखे, तनुजा घनवट तसेच पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, डॉ. सुभाष पोकळे आदिंनी जिल्हा परिषदेकडे तसेच पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करुन कामे मंजुरीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे विविध गावांतील पाणी योजनांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यात होऊन या कामांना राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
एक कोटी रकमेपर्यंतच्या कामांना जिल्हा परिषदेमार्फत मान्यता देऊन कार्यवाही केली जाईल. एक कोटींवरील कामांसाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा व महाराष्ट्र जिवन प्राधिकरण या यंत्रणांमार्फत आवश्‍यक कार्यवाही होऊन प्रस्ताव सुधारीत अंदाजपत्रकांसह अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवले जातील. त्यानंतर कामांची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामे सुरु होतील. ही सर्व मंजुर कामे लवकरात लवकर सुरु व्हावीत यासाठी राज्य शासनाकडे व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार आढळराव पाटील यांनी दिली.

 • मंजुरी देण्यात आलेल्या पाणी योजना
  आंबेगाव तालुका :
  आंबेदरा 36.81, चांडोली खुर्द 99.56, कारेगाव (कराळेवस्ती) 23.92, कोळवाडी कोटमदरा (पानसरवस्ती) 56.64, लोणी 40. 56, मांदळेवाडी 135.2, पहाडदरा (ठाकरवाडी) 17.50, पिंपळगाव तर्फे घोडा (पोखरकरवाडी) 43.68, तळेकरवाडी 35.21, थोरांदळे 57.20, थुगाव 52.00 लाख रुपये.
  जुन्नर तालुका :
  बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 60 कोटी, नारायणगाव शहर 13 कोटी 96 लाख, आगर (महाबरेवाडी) 30, आगर (अमरापूर), 50, अंजनावळे 74, बेल्हे (धगीमळा) 46, देवळे (चिंचेचीवाडी) 13.71, देवळे (घोटमल) 12, घाटघर 50, गोलेगाव (गणपती ठाकरवस्ती) 10, गोलेगाव 30, हातवीज (सुपेवाडी) 15, जळवंडी 45, खामगाव 45, खटकाळे (खैरे) 25, खटकाळे 30, कुरण 20, कुसुर (नवीन कुसुर) 35, नारायणगाव 1396.68, निमगिरी 15, निरगुडे 80, पिंपळगाव सिद्धनाथ 40, सावरगाव (काचळवाडी) 20, वडज 20, बेल्हे 46, वडगाव सहाणी 35 लाख.
  खेड तालुका : चास 65, धानोरे 210, कडधे 65, काळूस 120, कमान 60, कान्हेवाडी बुद्रुक 41.75, खालुंब्रे 306.75, कुडे बुद्रुक वाड्यावस्त्या 97.12, कुरकुंडी 60.28, मिर्जेवाडी 70, रासे 70, सायगाव 50, कन्हेरसर 97.16, कोयाळी तर्फे चाकण 105, टाकळकरवाडी 30 लाख.
  शिरुर तालुका : कवठे येमाई (हिलालमळा) 40, माळवदेवस्ती 40, मुंजळवाडी : 45, मलठण(दंडवतेदरा) 60, मिडगुलवाडी 118.36 लाख रुपये.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)