आणखी 18 रुग्णांचा मृत्यू ः एकूण बाधित 28,065
पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 28 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत शहरात 28,065 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 584 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 1013 रुग्णांची वाढ झाली आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज पाच वाजेपर्यंत 18 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील 987 व शहराबाहेरील 26 जणांचाही तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दिवसभरात एकूण 1013 नवीन रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत शहरात 5250 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 399 रुग्णांचाही समावेश आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शनिवारी दिवसभरात 18 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 15 तर शहराबाहेरील 3 रुग्णांचा बळी गेला. शहरातील सहयोगनगर, आकुर्डी, भोसरी, डांगे चौक थेरगाव, वाल्हेकरवाडी चिंचवड, काळेवाडी, चिखली, चिंचवड, थेरगाव, पिंपरी, स्पाईन रोड भोसरी येथील 15 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील चाकण, देहूरोड येथील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 518 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 19,312 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1966 संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.