कराड तालुक्‍यातील 101 जण विसर्जन कालावधीत हद्दपार

कराड – गणेशोत्सव विसर्जन काळात उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. गणेशोत्सव शांततेत पार पडावा. यासाठी उंब्रज पोलीस स्टेशनचे हद्दीतील 101 जणांना विसर्जन कालावधीत कराड तालुक्‍यातून हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. गोरड म्हणाले, गणेशोत्सव काळात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील 25 डॉल्बी साउंड सिस्टीम या जागेवरच सील करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून गणेशोत्सव व विसर्जन कालावधीमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल असलेले व अवैध दारु प्रकरणातील पोलीस स्टेशन हद्दीतील 101 व्यक्तींवर दि. 10 ते 12 या कालावधीत कराड तालुक्‍यातून हद्दपार करण्यात आलेले असून तसे आदेश बजावण्यात आलेले आहेत. तर 265 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये गणेश विसर्जन कालावधीत व्हीडीओ शुटींग ठेवण्यात येणार असून शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही गोरड यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)