केंद्राकडून आतापर्यंत 101 कोटी डोसचा पुरवठा

नवी दिल्ली  – केंद्र सरकारने आतापर्यंत करोनालसींच्या 101 कोटींहून अधिक डोसचा पुरवठा राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केला आहे. त्यातील 11 कोटी डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत, अशी माहिती शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

देशातील मोफत लसीकरणासाठी केंद्राकडून लसींचे डोस पुरवले जात आहेत. देशातील उत्पादकांकडून लसींचे 75 टक्के डोस खरेदी करून केंद्र सरकार त्यांचा मोफत पुरवठा राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना करते. देशात सध्या 18 वर्षांवरील प्रौढ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.

त्यांना आतापर्यंत देण्यात आलेल्या डोसची संख्या 98 कोटींच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे डोस संख्येबाबत देश 100 कोटींच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.