Corona : पुढील 2 आठवड्यात महाराष्ट्रात दिवसाला 1000 जणांचा करोनामुळे मृत्यू होणार, आरोग्य विभागाने व्यक्त केली भीती

मुंबई – राज्यात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दररोज नवीन करोबाधितांची संख्या वाढतीच आहे. त्यातच आता पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढणार असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केलीय.

चार एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत जाण्याची व दिवसाला एक हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच सर्वाधिक रुग्णवाढ ही पुणे, नागपूर आणि मुंबईत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा अपुऱ्या पडतील असे सांगितले जात आहे. तसेच नागपूर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील 11 दिवसांत मृतांची संख्या 64 हजारांचा टप्पा ओलांडण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

सर्व जिल्ह्यांतून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीवरून राज्यातील करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण आठवड्याला एक टक्क्याने वाधत असल्याचे स्पष्ट झालेय. याच आकडेवारीवरून हा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. संकलित आकडेवारीवरून मृत्यू दर 2027 टक्के असल्याचे सांगिण्यात आल ेआहे. याच आकडेवारीवरून पुढील दोन आठवड्यातील परिस्थितीचा अंदाज लावण्यात आला आहे.

त्यानुसार, पुढील दोन आढवड्यात राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या 28 लाख 24 हजार 382 इतकी होईल आणि मृतांचा आकडा हा 64 हजार 613 पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. म्हणजेच राज्यातील पुढील दोन आठवड्यांत करोनामुळे दिवसाला 1000 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यामध्ये बेड्सची संख्या, आयसीयू बेड्स आणि व्हेटिंलेटर्सची संख्या पुरेशी असली तरी ऑक्सिजन सेवा असणाऱ्या बेड्सची संख्या 4000ने वाढवण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केलीय. पुढील काही दिवसांमध्ये ठाणे आणि नागपूर या 2 जिल्ह्यांमधील बेडची संख्या वाढवली नाही तर परिस्थिती गंभीर होईल अशी भीती राज्यातील आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यात बुधवारी 31 हजार 855 नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. करोनाचा संसर्ग सुरु झाला तेव्हापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यात रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर राज्यातील अॅक्टिव्ह करोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 47 हजार 299 इतकी झाली आहे. बुधवारी राज्यात 95 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर एकूण करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 53 हजार 684 झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.